*मळेवाड कोंडुरे गावातील ग्रामस्थांना मळेवाड उपकेंद्रातच लस द्या*

*मळेवाड कोंडुरे गावातील ग्रामस्थांना मळेवाड उपकेंद्रातच लस द्या*

*कोकण Express*

*मळेवाड कोंडुरे गावातील ग्रामस्थांना मळेवाड उपकेंद्रातच लस द्या*

*मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामपंचायतकडून निवेदन*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

मळेवाड कोंडुरे गावातील ग्रामस्थांना मळेवाड उपकेंद्रातच लस द्या. अशी मागणी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतकडून निवेदन देऊन करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. लस घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी करणे गरजेचे असल्याने लस टोचून घेण्यासाठी मळेवाड कोंडूरे गावा व्यतिरिक्त अन्य भागातूनही मोठ्याप्रमाणात लस घेण्यासाठी नाव नोंदणी केली जात आहे. यामुळे या आरोग्य केंद्राच्या ठिकाणी गर्दी होत आहे. मळेवाड कोंडूरे गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून लसीकरण केंद्रावर अन्य गावातील व्यक्तींमुळे होणाऱ्या गर्दीतून गावातील प्रादुर्भाव वाढू शकतो. तसेच इतर ठिकाणचे व्यक्ती लसीकरणासाठी नाव नोंदणी करत असल्याने मळेवाड गावातील व्यक्तींना पुरेशी लस उपलब्ध होत नाही. यामुळे मळेवाड कोंडूरे गावातील ग्रामस्थांसाठी मळेवाड उपकेंद्राला लस उपलब्ध करून त्या ठिकाणी गावातील ग्रामस्थांचे लसीकरण करावे. अशा मागणीचे निवेदन सरपंच हेमंत मराठे यांच्या वतीन मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अदिती ठाकूर यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य सानिका शेवडे यांनी दिले. याबाबत सकारात्मक निर्णय घेवू असे आश्वासन डॉ ठाकूर यांनी शेवडे यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!