कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य सरकारकडून कडक निर्बंध

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य सरकारकडून कडक निर्बंध

*कोकण  Express*

*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य सरकारकडून कडक निर्बंध*

*गोव्यात दररोज ये-जा करणाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची…*

*बांदा ः प्रतिनिधी*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य सरकारकडून कडक निर्बंध करण्यात आले असून नोकरीसाठी दररोज ये जा करणाऱ्यांना सुद्धा कोरोना चाचणी अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. बुधवारपासून गोवा पोलिसांच्या पत्रादेवी तपासणी येथे कडक तपासणी सुरु करण्यात आली.सिंधुदुर्ग मधून नोकरी धंद्यासाठी जाणाऱ्या शेकडो युवकांना कोरोना तपासणी अहवाल नसल्याने माघारी पाठविण्यात आले.सकाळी काहींना प्रवेश देण्यात आला.गोवा सरकारकडून दररोज ये जा करणाऱ्यांसाठी अहवाल गरजेचा नसल्याचे सांगितले होते.मात्र बुधवारपासून पोलिसांनी अचानक युवकांना माघारी पाठविले.त्यामुळे युवकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. तर शासनाकडून यावर काहीतरी ठोस निर्णय करावा अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!