कणकवलीत कापड दुकानदारावर गुन्हा दाखल

कणकवलीत कापड दुकानदारावर गुन्हा दाखल

*कोकण  Express*

*कणकवलीत कापड दुकानदारावर गुन्हा दाखल!*

*जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी केली कारवाई…!*

*कारवाईसाठी मुख्याधिकारी अवधुत तावडे यांची कारवाई…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली नगरपंचायतकडून लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक करण्यात आली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कणकवली बाजारपेठेतील एका कापड दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी खुद्द मुख्याधिकारी अवधुत तावडे मैदानात उतरल्याने सकाळपासूनच नगरपंचायत चे पथक आज ऍक्टिव्ह झाले होते. कणकवली बाजारपेठेत मनमंदिर हे कापड दुकान सुरू असल्या बाबत माहिती मिळाल्या नुसार नगरपंचायत पथकाने तपासणी केली असता या कापड व्यावसायिकाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार भागीरथ धीराराम प्रजापति याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भा.द.वि कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नगर पंचायत कर्मचारी रमेश कदम यांनी फिर्याद दिली असून, कणकवली नगरपंचायत ने केलेल्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कालच कारवाईचे संकेत दिले होते. त्यानंतर आज मंगळवारी सकाळपासूनच मुख्याधिकारी अवधुत तावडे हे स्वतः कणकवली शहरात तपासणी करता फिरत असताना नगरपंचायत कर्मचाऱ्यांनीही ॲक्टिव्ह पणे काम करण्यास सुरुवात केली होती. तसेच ज्या घरांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे त्या घरातील व्यक्तीने नियमाप्रमाणे 14 दिवस क्वारनटाईन रहायचे आहे. अशा व्यक्ती जर शहरात फिरताना आढळल्या तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी दिला आहे.

मंगळवारी केलेल्या कारवाईत नगरपंचायतीच्या पथकांमध्ये रवी महाडेश्वर, प्रशांत राणे, संतोष राणे, रमेश कदम, सचिन तांबे यांचा समावेश होता. तर कणकवली पटवर्धन चौकात वाहतूक पोलिस संदेश आबिटकर, आरोग्य पथकात तेजस्वी पारकर, दिनेश जाधव, लक्ष्मण वळवी हे कार्यरत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!