*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या हस्ते कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त पहाटेची पूजा संपन्न*
*कणकवली : संजना हळदिवे*
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त भक्तिमय वातावरणात पहाटेची पूजा संपन्न झाली. या पवित्र पूजेचा मान शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांना लाभला.
संजय आंग्रे यांनी सहकुटुंब श्री कुणकेश्वर देवाचे मनोभावे दर्शन घेत पूजाअर्चा केली. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. एकनाथ तेली, देवस्थान समितीचे पदाधिकारी, मानकरी, ग्रामस्थ तसेच आंग्रे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
पूजेनंतर श्री कुणकेश्वर देवाच्या चरणी कोकणवासीयांचे सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि सर्वांगीण विकास व कल्याणासाठी संजय आंग्रे यांनी मनोभावे प्रार्थना केली. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

