वेंगुर्ल्यात ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

वेंगुर्ल्यात ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ल्यात ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा*

*वेंगुर्ला : प्रतिनिधि*

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय जनता पक्षाच्या वेंगुर्ला येथील कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून दिन साजरा करण्यात आला.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश रेगे यांना पुष्पगुच्छ देऊन ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील योगदान, अनुभव आणि मार्गदर्शन हे पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष किशोर नरसुले, कार्यवाह जगदीश तिरपुडे, सदस्य शामराव काळे आणि सदस्य प्रदीप कुबल उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर व्यक्त करून त्यांच्या अनुभवांना आणि सामाजिक योगदानाला सलाम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम उत्साहात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!