सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नेरूर शाखेचा नवीन वास्तूमध्ये स्थलांतर सोहळा संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नेरूर शाखेचा नवीन वास्तूमध्ये स्थलांतर सोहळा संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नेरूर शाखेचा नवीन वास्तूमध्ये स्थलांतर सोहळा संपन्न*

*नेरूर (कुडाळ):*

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्गच्या ‘नेरूर’ शाखेचा नवीन वास्तूमध्ये स्थलांतर सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत बँकेच्या या नव्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
​या सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, नीता राणे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर, पंचायत समिती सभापती श्री. मिलिंद नाईक, श्री. संजय पडते, श्री. बाबा परब, श्री. प्रकाश मोर्ये यांच्यासह संचालक मंडळातील इतर मान्यवर उपस्थित होते.
​तसेच या कार्यक्रमाला परिसरातील सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन वास्तूमुळे नेरूर आणि परिसरातील खातेदारांना अधिक तत्पर व अद्ययावत सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!