सरकारने कर्जमाफी करण्याअगोदर जिल्हा बँक मदतीला धावली महाराष्ट्रात हे पहिलं उदाहरण आहे की बँक पहिली धावली नंतर सरकार ने मदत घोषित केली:निलेशराणे

सरकारने कर्जमाफी करण्याअगोदर जिल्हा बँक मदतीला धावली महाराष्ट्रात हे पहिलं उदाहरण आहे की बँक पहिली धावली नंतर सरकार ने मदत घोषित केली:निलेशराणे

*कोंकण एक्सप्रेस*

*सरकारने कर्जमाफी करण्याअगोदर जिल्हा बँक मदतीला धावली महाराष्ट्रात हे पहिलं उदाहरण आहे की बँक पहिली धावली नंतर सरकार ने मदत घोषित केली:निलेशराणे*

*सिंधुदुर्ग बँकेला देशपातळीवर नेण्याचे श्रेय मनीष दळवी यांचेच ; निलेश राणे*

*जिल्हा बँकेच्या नेरूर शाखा कार्यालयाचे आम. निलेश राणे यांच्या हस्ते नूतन वास्तूत स्थलांतर*

*नेरूर (वार्ताहर) :*

राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या बँकेला कुठे डाग लागू न देता गेल्या पाच वर्षात बँकेला ज्या प्रगती पथावर नेण्यात आलं त्याबद्दल मी मनीष दळवी यांचे कौतुक करतो. राणेसाहेबांना जे अभिप्रेत होते त्याच्यापेक्षाही चांगली बँक सांभाळली असेच कार्य तुमच्या हातून घडत राहो. प्रामाणिकपणे तुम्ही बँक सांभाळताय बँकेला जी शिस्त लावली त्याचं रूपांतर आज प्रॉफिट मध्ये दिसून येत आहे. लोकांचे हिताचे निर्णय तुम्ही घेत अहात. मागच्या कर्जमाफीमध्ये सरकारने कर्जमाफी करण्याअगोदर जिल्हा बँक मदतीला धावली महाराष्ट्रात हे पहिलं उदाहरण आहे की बँक पहिली धावली नंतर सरकार ने मदत घोषित केली. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी नेरूर येथे केले सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेरूर शाखा कार्यालयाचा स्थलांतर सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी संपन्न झाला. यावेळी निलेश राणे यांनी जिल्हा बँकेच्या प्रगतीचे कौतुक केले. राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जिल्हा बँकेने उत्तुंग कामगिरी केली आहे. याचे श्रेय जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना जात असल्याचे सांगून ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी संचालक मंडळ आणि अधिकारी, कर्मचारी वर्गाने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

नेरूर देउळवाडा येथील बापू सडवेलकर यांच्या इमारतीत जिल्हा बँकेच्या नेरूर शाखा कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले आहे. या नूतन कार्यालयाचे उदघाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, संचालक आत्माराम ओटवणेकर, प्रकाश मोरे, विद्याप्रसाद बांदेकर,सौ नीता राणे, संदीप परब व्हीक्टर डान्टस,रवींद्र मडगावकर,केशव नारकर अध्यक्ष कुडाळ खरेदी विक्री संघ, सौ. भक्ती घाडीगावकर सरपंच नेरुर, सौ. स्वाती करलकर सरपंच कवठी, राजेश प्रभू सरपंच वालावल, मंगेश बांदेकर अध्यक्ष महादेव विकास संस्था कवठी, सुनील नाईक अध्यक्ष चिंदवन विकास संस्था, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, नेरुर शाखा व्यवस्थापक सौ युगा पेडणेकर यांच्यासह बँकअधिकारी श्याम सरमळकर, निलेश कनयाळकर, बँकेचे ग्राहक अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, आमचा प्रयत्न आहे सामान्य शेतकरी ग्राहक असेल त्यांच्यापर्यंत बँक पोचली पाहिजे. बँकेत आल्यावर त्याला समाधान वाटलं पाहिजे. त्यांच्यासाठी चांगली बौद्धिक सुविधा देण्याचा जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत आमच्या कार्यकालच्या पाच वर्षातबँकेने ८००० कोटीचा व्यवसाय या बँकेने पूर्ण केलेला असेल त्या दृष्टीने वाटचाल आमची चालू आहे. ग्राहकांनी एवढा विश्वास आमच्यावर टाकला आहे..साथ दिली असेल तर त्यांच्या सोयी सुविधा बँकेच्या माध्यमातून त्यांना दिल्या पाहिजेत या बांधीलकितून आम्ही काम करत आहोत निलेश राणे यांनी या मतदारसंघात ज्या ज्या शाखांची उद्घाटने केली त्या त्या सर्व शाखांची प्रगती झालीआहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत असे मनीष दळवी शेवटी म्हणाले.
यावेळी बँकेच्या वतीने जागा मालक बापू सडवेलकर यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!