साळशी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव

साळशी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव

*कोंकण एक्सप्रेस*

*साळशी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव*

*सुखशांती मंडळाचा स्तुत्य उपक्रम*

*शिरगाव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील साळशी-सरमळेवाडी येथील सुखशांती मंडळाच्या वतीने माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथील इयत्ता दहावीच्या मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच प्रशालेचा १०० टक्के निकाल लागल्याबद्दल शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या प्रशालेतील हिमानी चंद्रकांत घाडी ( ९१ % प्रथम), तनिषा संजय गावकर (८६. २० % द्वितीय) व जान्हवी प्रशांत गावकर ( ८५. २० % तृतीय) या विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह, भेटवस्तू, अभिनंदनपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच १०० टक्के निकालाबद्दल शिक्षकांचा सन्मानचिन्ह, अभिनंदनपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे सचिव राजेंद्र साटम यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देताना, विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक व्हावे व त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गेली १२ वर्षे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
सुखशांती मंडळाचे सल्लागार यशवंत लाड यांनी प्रतिकूल परिस्थितीतही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद असल्याचे सांगून गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
साळशी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सत्यवान सावंत, उपाध्यक्ष प्रभाकर साळसकर, स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान भोगले व शिक्षणप्रेमी किशोर लाड यांनी सुखशांती मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारे असे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
सहाय्यक शिक्षक पुरुषोत्तम साटम यांनी सूत्रसंचालनातून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा व नवचैतन्य मिळते, असे सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरतो, असेही त्यांनी सांगितले.
स्वप्नील भरणकर यांनी मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक व्यक्त करून उपस्थित मंडळाचे पदाधिकारी, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
चौकट:
सरमळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक समाधान कोळी यांनी गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांत मिळविलेले उल्लेखनीय यश, आशयज्ञान स्पर्धेतील यश व शाळेच्या बाह्य स्वरूपात केलेल्या सकारात्मक बदलांची दखल घेऊन त्याचा साळशी ग्रामविकास मंडळाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सुखशांती मंडळाचे सचिव राजेंद्र साटम, सल्लागार यशवंत लाड, सुरेश कदम, अनंत पवार, साळशी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सत्यवान सावंत, उपाध्यक्ष प्रभाकर साळसकर, स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान भोगले, शिक्षणप्रेमी किशोर लाड, सरमळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक समाधान कोळी, सहशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!