*कोंकण एक्सपेस*
*दवाखान्यात कमी पडणारी औषधे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली उपलब्ध करून*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
वैभववाडी तालुक्यातील रुग्णालयात टी.टी. इंजेक्शनची कमतरता होत होती हि बाब पंचायत समितीचे सभापती सिद्धेश दिलीप रावराणे यांच्या लक्ष्यात येताच त्यांनी पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली पालकमंत्री यांनी तात्काळ 800 इंजेक्शन उपलब्ध करून दिली वैभववाडीचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे 15 ऑगस्ट रोजी सुपूर्त करण्यात आले यावेळी सभापती सिद्धेश रावराणे, तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे, गटविकास अधिकारी श्री वाघ, उपसभापती साची कोलते, नासिर काझी, देवानंद पालांडे, मंगेश लोके, सुवर्णा संसारे, साधना नकाशे, स्वप्नील धुरी इत्यादी पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते
पालकमंत्री नितेश राणे यांनी महत्वाची इजेक्शन उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांनी आभार मानले आहेत

