वेंगुर्ला नगरपरिषदमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

वेंगुर्ला नगरपरिषदमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला नगरपरिषदमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*
*वेंगुर्ला प्रतिनिधी  : प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला नगरपरिषद येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन आज उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या क्रॉफर्ड मार्केट इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.  नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक , नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावून सेवा बजावलेल्या माजी सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये राजेश हिरोजी व  विनायक परब यांचा नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर व मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी सैनिकांनी देशसेवेत बजावलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले. देशाच्या सार्वभौमत्वाचे व अखंडतेचे रक्षण करण्यासाठी सैनिकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण करून त्यांच्या सेवेला अभिवादन करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांनी सर्वांना शुभेच्छा देत देशाच्या विकासासाठी, स्वच्छ व सुंदर वेंगुर्ला शहरासाठी तसेच नागरिकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास   नगरसेवक, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी, माजी सैनिक व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!