*कोंकण एक्सप्रेस*
*मानवसंसाधन विकाससंस्थेच्या वतीने प्रोजेक्ट संजीवनी या ॲम्बुलन्सचा शुभारंभ*
*कुडाळ मालवण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि श्रीफळ वाढवून शुभारंभ*
*सिधुदुर्गनगरी*
देशात आणि परदेशात सुरेशप्रभू सारखी कोकणातील महत्त्वाची व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत त्यात सुरेश प्रभू यांचे महत्त्वाचे योगदान असून लंडन सारख्या देशात काम करून कोकणच्या मातीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण जनतेच्या विकासासाठी “प्रोजेक्ट संजीवनी ” सारखे अनेक कार्यक्रम राबवितात. कोकणाने अनेक रत्न दिली त्यात सुरेश प्रभू हे कोकणचे बावनकशी सोन असून त्यांचे महत्त्व कोणी कमी करू शकत नाही,जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी केंद्रातून नवनवीन उपक्रम आणावे त्यासाठी आम्ही सदैव सहकार्य करूअशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली .
मानवसंसाधन विकाससंस्थेच्या वतीने प्रोजेक्ट संजीवनी या ॲम्बुलन्सचा शुभारंभ कुडाळ मालवण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू मानव विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू जि प उपाध्यक्ष दादा साईल ,शिक्षण आरोग्य सभापती प्रितेश राऊळ,गोव्याचे उद्योगपती अनिल खवटे,चार्ट अकाउंटंट सुनील सौदागर सदाशीव ओगले जी .टी .राणे, संजय सावंत, डॉ. शरद सावंत, योगेश प्रभू, जनशिक्षणचे अध्यक्ष मोहन होडावडेकर माझी जि प अध्यक्ष काका कुडाळकररत्नागिरी जि प माजी अध्यक्ष सुभाष बने नितीन सावंतमोहन सावंत अणाव सरपंच लीलाधर आणावकर, भाजपा सरचिटणीस प्रसन्न देसाई, सावळाराम आणावकर ,विलास हडकर आदींसह संस्थेचे विश्वस्त ग्रामस्थ विविध मान्यवर नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते .
प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करूनकरण्यात आले तर प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्ष उमा प्रभू यांनी केले त्यानंतर प्रोजेक्ट संजीवनी ॲम्बुलन्स चा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या या ग्रामीण जनतेच्या विकासासाठी प्रकल्पाला भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या

आमदार निलेश राणे म्हणाले माजी केंद्रीय मंत्री आणि कोकणाचे एक महत्त्वाचे बावनकशीसोन देशात आणि परदेशात लंडन सारख्या देशात काम करत असूनही कोकणाकडे त्यांचे लक्ष आहे कोकणच्या विकासासाठी त्यांची सततची धडपड असून अनेक उपक्रम राबवीत असतात देशात अनेक भारतरत्न होऊन गेले आणि आहेत आज कोकणचं नाव सुरेश प्रभूंनी दिल्लीच्या राजकारणात सतत पुढे ठेवलं आहे
गेली ३० वर्ष लोकप्रतिनिधी या नात्याने सुरेश प्रभू हे कोकणात, सिंधुदुर्गात आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत आहेत ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे प्रभू हे कोकणच्या नररत्नांपैकी एक आहेत एवढेच काय तर ते कोकणचं सोनंच आहे. त्यांचं महत्त्व कोणी कमी करू शकत नाही प्रभू यांनी जिल्ह्यात असेच उपक्रम हाती घ्यावेत त्याला आमची सदैव साथ राहील सहकार्य राहील अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली
कोकण वासियांचं सिंधुदुर्ग वासियांचं भाग्य आहे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जगाच्या नकाशावर नावारूपास आला आहे आज सुरेश प्रभू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य विविध मंत्र्यांच्या समवेत काम करतात त्यांचे जगातही महत्त्वाचे योगदान आहे त्यांची विचारधारा महत्वपूर्ण असून त्यांचे काम कोणी कमी करू शकत नाही प्रोजेक्ट संजीवनी सारखा हा उपक्रम त्यांनी जिल्ह्यात आणला त्याचा फायदा ग्रामीण जनतेसाठी होऊ शकेल अनेक प्रकल्प त्यांनी राबविले कुडाळ सारख्या शहराला क्रीडा प्रबोधिनी करण्याचा आपला मानस असून कुडाळ एमआयडीसी मध्ये हा प्रकल्प आणण्याचा आपला प्रयत्न आहे त्यासाठी सुरेश प्रभूयांची साथ लागणार कोकणच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आपले प्रेम असेच कायम असू द्या आपण नवनवीन प्रकल्प या जिल्ह्यात आणा त्यासाठी आम्ही सदैव सहकार्य करू असेहीआमदार निलेश राणे यांनी शुभेच्छा देताना सांगितले
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणालेआपल्या निवडणूक काळात प्राध्यापक मधु दंडवतेयांच्या समवेत निवडणूक झाली त्यावेळीही त्यांना मीशुभेच्छा दिल्या खासदार नारायण राणेसमवेतही आणि आपल्या समवेतही झालेल्या निवडणुकीमध्ये माझे त्यांच्या आणि आपल्यामध्ये कधीही मतभेद झाले नाहीतत्यांचे आणि माझे आज कौटुंबिक जिव्हाळ्याचेरिलेशन आहेत राजकारण विरहित चांगल्या कामासाठी माझे सदैव सहकार्य राहील मतभेद पक्षभेद बाजूला ठेवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी मानव संसाधन विकास कृषी संशोधन केंद्र यांच्यासारख्या संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या मदतीचे काम आपण करूया आपल्या म्हणण्यानुसार कुडाळ एमआयडीसी येथे क्रीडा प्रबोधिनी प्रकल्प आणून चांगला कबड्डी क्रिकेट स्पोर्ट इव्हेंट कार्यक्रम राबवूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात ही क्रीडाविषयक उपक्रमाचा उल्लेख झाल्याचेही त्यांनी स्पष्ट करताना कोकणच्या मातीचा अधिकाधिक विकास करण्यासाठी गोव्यापेक्षा सिंधुदुर्गचापर्यटन वाढीसाठी विकासासाठी प्रयत्न करूया असे त्यांनी सांगितले .
उपस्थित यांचे आभार डॉ . शरद सावंत यांनी मानले

