*कोंकण एक्सप्रेस*
*उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची सभापती सिद्धेश रावराणे यांच्याकडून तात्काळ दखल*
*वैभववाडीतील समस्यांवर सकारात्मक तोडगा*
*वैभववाडी : प्रतीधिनी*
येथील रस्त्यालगतची झाडे-झुडपे, खड्डे तसेच एस.टी. स्टँड परिसरातील प्रलंबित समस्यांबाबत अर्जदार श्री. डी. के. सुतार यांनी मांडलेल्या विषयांची पंचायत समिती सभापती सन्माननीय श्री. सिद्धेश दिलीप रावराणे यांनी तात्काळ गंभीर दखल घेतली आहे. जनतेच्या प्रश्नांबाबत अत्यंत तत्परता व संवेदनशीलता दाखवत त्यांनी उपोषणाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
सभापती सिद्धेश रावराणे यांनी संबंधित सर्व विषयांची सविस्तर माहिती जाणून घेत प्रशासनाशी थेट समन्वय साधला. तसेच या सर्व समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तात्काळ सुरू केली. लोकप्रतिनिधींच्या या सकारात्मक व गतिमान भूमिकेमुळे उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी उपसभापती सौ. साची कोलते, गटविकास अधिकारी श्री. वाघ साहेब, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, सुवर्ण संसारे यांच्यासह विविध विभागांचे सर्व अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

