सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी भरत चव्हाण; कुडाळ येथे भव्य सत्कार व संवाद मेळावा उत्साहात

सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी भरत चव्हाण; कुडाळ येथे भव्य सत्कार व संवाद मेळावा उत्साहात

*कोंकण एक्सप्रेस*

*सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी भरत चव्हाण; कुडाळ येथे भव्य सत्कार व संवाद मेळावा उत्साहात!*​

*कुडाळ ः प्रतिनिधी*

सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी वेंगुर्ला आगाराचे भरत चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल, सेवाशक्ती संघर्ष समितीच्या वतीने कुडाळ येथील वेताळ बांबर्डे तेली समाज हॉल येथे त्यांचा भव्य सत्कार समारंभ व संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
​या सोहळ्याला नवनिर्वाचित उपाध्यक्ष भरत चव्हाण यांच्या पत्नी, आई-वडील व मुलांची विशेष उपस्थिती होती.
​संघटनेचे कामगार हित जपण्याचे आश्वासन
​कार्यक्रमात बोलताना जिल्हाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत म्हणाले, “मनुष्य म्हणून काम करताना १००% सर्व बरोबर असेल असे नाही, काही कमतरता असू शकतात. मात्र, आम्ही कामगारांसाठी शक्य तितके काम करत आलो आहोत आणि पुढेही करू. राज्यात व देशात आपली सत्ता असल्याने कर्मचाऱ्यांचे प्रश्न नक्कीच सुटतील. कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे, जिथे त्रास होईल तिथे संघटना पाठीशी उभी राहील.”
​तसेच आपल्या पाठीशी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे नेहमीच भक्कमपणे उभे असल्याचे त्यांनी नमूद केले. भरत चव्हाण यांची ही निवड कोणत्याही शिफारशीने झालेली नसून, त्यांनी संघटना वाढीसाठी दिलेल्या योगदानाचे हे फळ आहे, असे सांगत त्यांनी संघटनेचे संस्थापक व आमदार गोपीचंद पडळकर यांचे आभार मानले.
​एसटीच्या सद्यस्थितीवर चर्चा
​सिंधुदुर्ग विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांनी एसटीच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने खरेदी केलेल्या ‘लालपरी’ व ‘जिजाऊ’ बसेस पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग विभागाला मोठ्या प्रमाणात मिळाल्याने चालक-वाहकांना दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सीएनजी बसेसमुळे वेळापत्रक कोलमडत असल्याने केंद्रीय कार्यकारिणीने यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली.
​सत्कारमूर्ती भरत चव्हाण यांचे मनोगत
​सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित महाराष्ट्र उपाध्यक्ष भरत चव्हाण म्हणाले, “जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या साथीमुळेच मी सर्व आगारांत संघटना वाढवू शकलो. सिंधुदुर्ग विभागात कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी एसटीचे निवृत्त कर्मचारी व सल्लागार अशोक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लागल्या आहेत.”
​प्रमुख उपस्थिती व सूत्रसंचालन
​प्रमुख पाहुणे व पदाधिकारी:
संघटनेचे उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर, बाळू देसाई, कुडाळ आगार अध्यक्ष जयेश चिंचळकर, केंद्रीय कार्यकारिणी कोषाध्यक्ष रामचंद्र मुंडे, पुणे प्रदेशाध्यक्ष अमोलजी तांबेकर, कोल्हापूर मीडिया प्रमुख कमलाकर अत्राम, आजरा आगार सहसचिव रोहित गबाले, भाजपा कामगार मोर्चा संयोजक व सल्लागार अशोक राणे, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गावंढळकर, माजी जि. प. सदस्या श्रीमती भारती चव्हाण, भाजपा कार्यकर्ते शैलेश जामदार आदी.
​विभागीय सदस्य व कार्यकर्ते:
स्वप्निल रजपूत, महादेव भगत, प्रशांत गावडे, मनोज कुमार पवार, शैलेंद्र परब, बाबली तुळसकर, अविनाश रणसिंग, अरुण पिळणकर, प्रथमेश घाडी, साई ओटवकर, पप्या गावडे, पंकज कासार, वैभव घोणे, पप्प्या मिठबावकर, रोहन शिंदे, सुधीर आडीवरेकर, आबा माणगावकर, दाजी तळवणेकर यांच्यासह जिल्ह्यातील चालक, वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​सूत्रसंचालन व आभार:
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. प्रास्ताविक केंद्रीय कोषाध्यक्ष रामचंद्र मुंडे यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुडाळ आगारातील प्रशांत गावडे व दिनेश शिरवलकर यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!