देवगड येथे होणाऱ्या मत्स्य महाविद्यालयाचा तात्काळ प्रस्ताव सादर करा* *- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश*

देवगड येथे होणाऱ्या मत्स्य महाविद्यालयाचा तात्काळ प्रस्ताव सादर करा* *- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश*

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड येथे होणाऱ्या मत्स्य महाविद्यालयाचा तात्काळ प्रस्ताव सादर करा*
*- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश*

*मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक*

*मुंबई*

*रामेश्वर-देवगड येथे आंबा संशोधन उपकेंद्रांतर्गत कीटकनाशक अवशेष तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रस्तावही कृषी विद्यापीठाने विभागाकडे सादर करावा असे निर्देश*

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे मत्स्य नवीन मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करून तो मंत्रीमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या समवेत आज मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्रालयात आंबा संशोधन उपकेंद्र रामेश्वर ता.देवगड व देवगड येथे मत्स्य महाविद्यालय स्थापन करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती .

मंत्रालयात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत मत्स्य महाविद्यालय स्थापनेच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मत्स्य व्यवसाय शिक्षणाचा विस्तार, उपलब्ध जागेचा वापर, आवश्यक पदनिर्मिती, नवीन इमारतीसाठी जमीन उपलब्ध करून देणे तसेच आवश्यक निधीची तरतूद या बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी कृषिमंत्री श्री. भरणे यांनी रामेश्वर, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे आंबा संशोधन उपकेंद्रांतर्गत कीटकनाशक अवशेष तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रस्तावही कृषी विद्यापीठाने विभागाकडे सादर करावा असे निर्देश देण्यात आले. या प्रयोगशाळेमुळे कोकणातील आंबा व अन्य फळपिकांच्या गुणवत्तेचे वैज्ञानिक परीक्षण स्थानिक स्तरावर होणार असून, निर्यातक्षम उत्पादनांना चालना मिळेल. शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अवशेष तपासणीची सुविधा उपलब्ध होऊन कोकणातील आंब्याच्या निर्यातीला मोठी गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!