विद्यामंदिर कणकवली मध्ये निसर्गातील रानभाज्याचे प्रदर्शन व विक्री उपक्रम उत्साहात साजरा

विद्यामंदिर कणकवली मध्ये निसर्गातील रानभाज्याचे प्रदर्शन व विक्री उपक्रम उत्साहात साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर कणकवली मध्ये निसर्गातील रानभाज्याचे प्रदर्शन व विक्री उपक्रम उत्साहात साजरा*

* कणकवली  : संजना हळदिवे*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली मध्ये निसर्गातील दुर्मिळ रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री हा उपक्रम इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात साजरा केला. या उपक्रमाचे उद्घाटन शि.प्र.मं. कणकवली चे ट्रस्टी अनिलपंत डेगवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक
पी.जे.कांबळे यांनी रानभाज्या या निसर्गाने मानवाला दिलेला आरोग्याचा अमूल्य खजिना आहे. कोणत्याही खताशिवाय पावसाळ्याच्या दिवसात माळ रानावर, डोंगरावर, शेताच्या बांधावर नैसर्गिकरित्या या भाज्या उगवतात. त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. असे त्यांनी सांगितले. यावेळी पर्यवेक्षक अच्युतराव वनवे यांनी सांगितले की आजच्या काळात भाज्या भरघोस पिकवण्यासाठी खतांचा वापर केला जातो. भाज्यांची मुळे उथळ असल्यामुळे कमी वेळात त्यांची वाढ होते. अशा भाज्या आपल्या आरोग्यासाठी घातक असतात.
या उपक्रमाचे आयोजन प्रशालेचे शिक्षक संदीप नागभिडकर, प्रसाद राणे, विद्या शिरसाठ, पृथ्वीराज बर्डे, राजेंद्र तवटे यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश सिंगनाथ यांनी केले. जनार्दन शेळके यांनी आभार प्रदर्शन करताना रानभाज्यांचे आरोग्यास होणारे फायदे सांगितले.
विद्यार्थ्यांनी आणलेल्या रानभाज्या अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनीही विकत घेऊन उपक्रम यशस्वी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!