*कोंकण एक्सप्रेस*
*राजापूर शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्मा. खलिफे मॅडम यांची घेतली भेट*
*सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ व्यावसायिक राजेंद्र पेडणेकर , संजय मालंडकर यांनी घेतली भेट*
*कणकवली : प्रतिनिधि*
कालच संपन्न झालेल्या गुरू पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आपल्या गुरू माऊली ची भेट घेतली राजापूर शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड हुस्नबानू खलिफे मॅडम यांची राजापूर नगरपरिषदेत भेट घेतली यावेळी विविध विषयांवर चर्चा सुध्दा करण्यात आली, या चर्चे दरम्यान विविध वार्ड मधील नगरसेवक आपल्या वार्ड मधील समस्या घेऊन येत होत आणि त्यांना नगराध्यक्ष योग्य तो सल्ला देत होत्या
यावेळी माऊली मित्र मंडळाचे सर्वेसर्वा श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि गाळे धारक श्री संजय बाबी मालंडकर यांनी नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे मॅडम यांना पुष्पगुच्छ💐 देवून, आशिर्वाद घेतले आणि आपल्या नगरपरिषदेत महत्त्व पूर्ण वेळ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत
श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी यावेळी असे प्रतिपादन केले की, राजापूर शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड हुस्नबानू खलिफे मॅडम या आमच्या कणकवली च्या, असुन आम्हाला त्यांनी विद्यादान करून घडविले आहे
कणकवली शहराच्या रहिवासी असून त्या उप जिल्हाधिकारी काझी साहेब यांच्या सुकन्या आहेत, असे हि श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी म्हटले आहे

