*रुग्णालय सावंतवाडीचा आरोग्य निर्देशांक मध्ये कोल्हापूर परिमंडळात द्वितीय क्रमांक

*रुग्णालय सावंतवाडीचा आरोग्य निर्देशांक मध्ये कोल्हापूर परिमंडळात द्वितीय क्रमांक

*कोंकण एक्सप्रेस*

*रुग्णालय सावंतवाडीचा आरोग्य निर्देशांक मध्ये कोल्हापूर परिमंडळात द्वितीय क्रमांक*

*सावंतवाडी : प्रतिनिधि*

आरोग्य विभागाने आरोग्य निर्देशांक प्रमाणे मूल्यांकन केले असता, कोल्हापूर परिमंडळ मध्ये उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी ने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
ह्या निर्देशांक मध्ये प्रामुख्याने रुग्णालयातील बाह्यरुग्ण संख्या, आंतररुग्ण संख्या, संस्थात्मक नॉर्मल आणि सिझेरियन प्रसूती, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, इतर मोठ्या आणि लहान शस्त्रक्रिया , रुग्णालयातील रोजची भरती असलेल्या रुग्णांची सरासरी संख्या अशा विविध निर्देशांक ची पाहणी केली केल्यानंतर हे मूल्यांकन केले आहे एप्रिल 2026 ते जून 2026 पर्यंत तीन महिना उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे एकूण बाह्यरुग्ण 25692, आंतररुग्ण 1908, संस्थात्मक प्रसूती एकूण 202, संपूर्ण लसीकरण 54, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 26,मोठ्या शस्त्रक्रिया 169, लहान शस्त्रक्रिया 746, या व्यतिरिक्त 274 रुग्णांची सोनोग्राफी, 2135 रुग्णांची CT scan तपासणी, 2839 रुग्णांची X ray तपासणी तसेच एकूण 48771 रक्त चाचणी करण्यात आली. तसेच अतिरक्तदाबाचे 1699 व 335 मधुमेही नव्याने शोधून उपचाराखाली आणण्यात आले.
: तसेच एकूण 468 रुग्णांचे डायलिसिस करण्यात आले, व 674 रुग्णांची नेत्रा तपासणी करून त्यांना उपचार देण्यात आला.
: कोल्हापूर परिमंडळ मध्ये उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज प्रथम क्रमांकावर असून, तिसरा क्रमांक महिला व बाल रुग्णालय कुडाळ च आहे.
या कामगिरीसाठी सर्व स्तरांतून उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी चे अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!