संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन…*

संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन…*

*कोंकण एक्सप्रेस*

*संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन…*

*सावंतवाडी: प्रतिनिधि*

​भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य संदीप गावडे यांचा वाढदिवस उद्या उत्साहात आणि सामाजिक भान जपत विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.​वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ जल्लोष न करता समाजोपयोगी उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला आहे. या दिनानिमित्त स्थानिक शाळांमधील विद्यार्थ्यांना फळवाटप केले जाणार असून, रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस करत त्यांनाही फळांचे वाटप करण्यात येणार आहे.​तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी रक्तदान शिबिरासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
​या सर्व सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तळवडे मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!