*कोंकण एक्सप्रेस*
*कनेडी हायस्कूलमध्ये गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या व शालोपयोगी वस्तूंचे वाटप*
*कणकवली : संजना हळदिवे*
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेत गरीब होतकरू विद्यार्थ्यांना वह्या व शालोपयोगी वस्तू यांचे वाटप करण्यात आले. प्रशालेतील निवृत्त प्राध्यापक व सध्या कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेच्या संचालकपदी असलेले सन्मा. श्री. व्ही. बी.सावंत यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रशालेतील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना 10000/- रु. किमतीच्या वह्या व इतर शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले आहे.
सदर साहित्य वितरण क.ग.शि. प्र. मंडळ मुंबईचे अध्यक्ष सन्मा. श्री. सतीश सावंत, दाते सन्मा. श्री व्ही.बी. सावंत ( संचालक, क. ग. शि. प्र. मंडळ मुंबई), शालेय समितीचे सदस्य सन्मा. श्री. तुषार सावंत, प्रशाला मुख्याध्यापक सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. श्री बयाजी बुराण यांच्या हस्ते संपन्न झाले.

