*कोंकण एक्सप्रेस*
*परमहंस भालचंद्र महाराज संस्थानात आज गुरुपौर्णिमा उत्सव*
*कणकवलीः संजना हळदिवे*
योगियांचे योगी, असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज संस्थानात बुधवार २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जाणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे ५.३० ते ७.०० समाधी पूजा, काकड आरती, जपानुष्ठान, सकाळी ७ ते ११ सर्व भक्तांच्यावतीने पाद्यपूजा-अभिषेक, १०.३० ते १२.३० श्री सत्यनारायण महापूजा, आरती, दुपारी १.०० तिर्थप्रसाद, महाप्रसाद, दुपारी १.०० ते सायं ६.०० सुश्राव्य भजने, सायंकाळी ७.०० धुपारती, रात्री ८.०० वा बाबांची दैनंदिन आरती असे कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविक भक्तांनी गुरुपौर्णिमा उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष, परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवली यांनी केले आहे.

