कै. नारायण लक्ष्मण आपटे पुरस्काराने मयुरी व कोमल यांचा सन्मान

कै. नारायण लक्ष्मण आपटे पुरस्काराने मयुरी व कोमल यांचा सन्मान

*कोंकण एक्सप्रेस*

*कै. नारायण लक्ष्मण आपटे पुरस्काराने मयुरी व कोमल यांचा सन्मान*

*कनेडी हायस्कूलचे उज्ज्वल यश*

*कणकवली : प्रतिनिधि*

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी – मार्च 2026 मध्ये कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेचा निकाल केवळ 100% न लागता या परीक्षेत कु. मयुरी महेश सावंत आणि कु. कोमल संजय सुर्वे या विद्यार्थिनींनी संस्कृत (संपूर्ण) विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त करत प्रशालेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या अभिमानास्पद कामगिरीमुळे या विद्यार्थिनींना कै. नारायण लक्ष्मण आपटे स्मृतीप्रित्यर्थ श्रीम. उष:प्रभा नारायण आपटे पुरस्कृत संस्कृत विशेष पुरस्कार सन्मा. प्रा. प्रदीप ढवळ (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ) यांच्या शुभ हस्ते व संस्थेचे अध्यक्ष सन्मा. श्री. सतीशजी सावंत व सर्व संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला आहे. रोख रक्कम रुपये 500/-, प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरणानंतर प्रमुख पाहुणे सन्मा. प्रा. प्रदीप ढवळ म्हणाले की, ‘संस्कृत आहे तर संस्कृती आहे. संस्कृत ही भारताची ज्ञानभाषा असून ती प्रत्येक भारतीयाची शान आहे. कनेडीसारख्या ग्रामीण भागातील मुले संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त करतात हे खरोखरच कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे.’
अथर्व गंगाराम तांबे, कु. रिद्धी रविकांत पेंडुरकर या दोन विद्यार्थ्यांनी सुद्धा संस्कृत विषयात 100 पैकी 99 गुणांची कमाई केली. प्रशालेतील कु. आर्या प्रदीप सावंत 97, कु. कृपा अनिल पेडणेकर 97, कु. दिव्या रेश्मा मेस्त्री 96, हर्ष दर्शन म्हापसेकर 94, कु. तनिष्का बाळकृष्ण सांगवेकर 94, कु. गुंजन गोपाळ पारकर 94, कु. प्राची महाबळेश्वर देसाई 92, कु. वल्लरी निलेश राणे या विद्यार्थ्यांनी सुद्धा संस्कृत विषयात 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. प्रशालेतील संस्कृत विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांपैकी 50% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत हे विशेष.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष सन्मा. श्री. सतीश सावंत व सर्व संचालक, शालेय समितीचे चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत, खजिनदार सन्मा. श्री गणपत सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री.सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्कृत अध्यापक श्री. मकरंद आपटे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!