*कोंकण एक्सप्रेस*
*नगराध्यक्ष संदेश पारकर यांची शिष्टमंडळाने घेतली भेट*
*सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ व्यापारी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी बांधवांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट*
*कणकवली : संजना हळदिवे*
आज दिनांक 24/07/2026 रोजी अप्पासाहेब पटवर्धन चौकातील, नगरपंचायत कणकवली च्या मालकीच्या जागेतील पक्की इमारत व त्याच्या बाजूने असलेल्या सरासरी 6 बाय 8 च्या गाळ्यांमध्ये गेली कित्येक वर्षे व्यवसाय करत असलेल्यांच्या वतीने, शिष्टमंडळाने नवीन होणार्या संकुलणा संदर्भात भेट घेतली
यावेळी याठिकाणी 10 ते 15 वर्षे गाळे भाडे तत्वावर घेऊन आजच्या घडीला पर्यंत व्यवसाय करत असलेल्यांच्या वतीने सुध्दा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते
यावेळी सन्माननिय नगराध्यक्ष संदेश जी पारकर यांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी वर्गाला आवश्यक त्या सुचना दिल्या, आणि ताबडतोब पुढील कार्यवाही करण्या संदर्भात कडक शब्दात अमंलबजावणी करा, असे सांगितले
यावेळी बंडु कोदे, अनिल मेस्त्री, संतोष महाजन, जमिल कुरेशी, इजाझ काजी, शेखर बाणे, महेश वायंगणकर, बाबुराव घाडीगावकर, प्रभाकर कदम, सुभाष उबाळे उपस्थित होते

