२३ जुलै २०२६ रोजी रोजगार मार्गदर्शन शिबिर आयोजन

२३ जुलै २०२६ रोजी रोजगार मार्गदर्शन शिबिर आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली तालुका व्यापारी संघाशी संलग्न महिला व्यावसायिक संघटनाची स्थापना* 

*२३ जुलै २०२६ रोजी रोजगार मार्गदर्शन शिबिर आयोजन*

*कणकवली : संजना हळदिवे*

वेगवेगळ्या व्यवसायात हल्ली महिलांची संख्या लक्षणीय वाढली असून, त्यांना व्यवसायात सक्षमपणे वावरता यावे तसेच व्यवसायातील आधुनिक काळातील आव्हाने व संधी याबद्दल माहिती व्हावी म्हणून वेगवेगळे उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहेत.
यातील पहिला टप्पा म्हणून, गुरुवार दिनांक २३ जुलै २०२६ रोजी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येत आहे.
‘रोजगार मार्गदर्शन व शासकीय योजनांची माहिती” याकरिता कणकवली कॉलेजच्या एच्.पी.सी.एल्. सभागृहात, सायंकाळी ४.०० ते ७.०० या वेळेत हे शिबिर संपन्न होणार असून शुभारंभ मान. सौ. गौरी पाटील-जोशी, मुख्याधिकारी, नगरपंचायत कणकवली यांच्या हस्ते होईल.
मार्गदर्शन करण्यासाठी (१) मा. कोमल माने, जिल्हा उद्योग निरीक्षक, जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग; (२) मा. प्रकाश दळवी, जिल्हा समन्वयक, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग आणि (३) मा. स्नेहल पुजारे, जिल्हा समन्वयक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग येणार असून प्रमुख उपस्थिती (४) मा. सौ. उमा नांदोस्कर, शाखाधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र, कणकवली यांची असणार आहे.

महिला उद्योजिका, व्यावसायिक तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या, स्पर्धेच्या युगात संधी शोधणाऱ्या सर्व इच्छुकांनी या मार्गदर्शन शिबिरास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दीपक बेलवलकर, अध्यक्ष, कणकवली तालुका व्यापारी संघ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!