*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री रवींद्र खेबूडकर यांच्या हस्ते*
*सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न*
*कणकवली : प्रतिनिधी*
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षा गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार सोहळा आज रविवार दिनांक 19जुलै 2026 रोजी भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे आयोजित करण्यात आला होता .
या कार्यक्रमात मा श्री रवींद्र खेबूडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या शुभ हस्ते , इस्रो सफरीसाठी व गोवा सायन्स सेंटर भेटीसाठी निवड झालेल्या तसेच जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना अडीज लाखाची रोख रक्कम, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .

तसेच *युवा संदेश प्रतिष्ठान आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले प्राथमिक विभागातून श्री. पंढरीनाथ धोंडी सावंत,पदवीधर शिक्षक
वि. मं. नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडी,तालुका वैभववाडी, व माध्यमिक विभागातून श्री संतोष पांडुरंग
सातार्डेकर,एम आर नाईक विद्यालय कोनाळकट्टा.ता. दोडामार्ग या उपक्रमशील शिक्षकांचे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक श्री संदेश उर्फ गोटया सावंत, अध्यक्षा संजना संदेश सावंत, कुडाळ गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत,पस सदस्य राजश्री पवार, विजय भोगटे, संजय सावंत, सुनील घाडीगावकर, प्रफुल काणेकर, मयुरी मुंज, वैष्णवी सुतार, मीनल पवार, अंजली शिरसाट, संतोष जाधव, विद्याधर तांबे, आणि शिक्षण प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते..
STS-2026 मधील जिल्हा गुणवत्ता यादीतील इयत्ता ४ थी, ६ वी आणि ७ वी मधील 30 गुणवंत विद्यार्थ्यांना मे maविमानाने ईस्त्रो सफर घडविण्यात आली आहे.
पुढीलवर्षी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- चे रविवार दिनांक 17 जानेवारी 2027 रोजी आयोजन करण्यात आले असून फॉर्म वितरण सुरु झाले आहे.
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेचे हे 10 वे वर्ष असून सिधुदुर्ग जिल्ह्यात 27 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.

