*कोंकण एक्सप्रेस*
*दोन दिवसांमध्ये ही डायलिसिसची सेवा उपजिल्हा रुग्णालयामध्ये पूर्ववत*
*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसूरकर यांनी समाधान केले व्यक्त*
*सावंतवाडी : प्रतिनधी*
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा डायलिसिस विभागाचा एरोप्लेन चा पंप नादुरुस्त झाल्याने तात्काळ सुरू करून घेतल्याबद्दल जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसूरकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय इथे सोमवारी डायलिसिस लागणारा एरोप्लेन मशनरी चा पंप नादुरुस्त झाल्याने अनेक रुग्णांना निराशा झाली होती या रुग्णालयामध्ये दर दिवशी पंधरा रुग्ण डायलिसिस मोफत सेवा घेण्यासाठी ग्रामीण भागातून येत असतात.
खाजगीरित्या ही सेवा डायलिसिसची सेवा घेण्यासाठी सुमारे पंधराशे रुपये आर्थिक संकट गोरगरीब रुग्णांना येत असते. डायलिसिस सेवा न मिळाल्याने अनेक रुग्णांनी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांच्याशी संपर्क साधल्याने तात्काळ दोन दिवसांमध्ये ही डायलिसिसची सेवा उपजिल्हा रुग्णालयामध्ये पूर्ववत झाली.
यासाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांना तात्काळ या डायलिसिस विभागाला लागणारा नादुरुस्त झालेला पंप लगेचच एका प्लंबरला बोलवून तात्काळ हा पंप काढून कुडाळ येथे कंपनीकडून लगेचच दुरुस्त करून घेण्यात आला यासाठी पुन्हा तो पंप दुरुस्त झाल्याने तात्काळ उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी आनंदराव गायकवाड यांनी पंप कुडाळ येथून जाऊन स्वतःच्या गाडीने आज बुधवारी दुरुस्त करून आणला लगेचच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे डायलिसिस विभागाचे किरण पारसेकर डायलेसिस विभागाचे टेक्निशन तसेच नितीन पांढरे टेक्निशन शिल्पा झोरे परिचारिका त्याचप्रमाणे सुप्रिया नाईक रुग्णालयाची हेड सिस्टर यांनी लगेचच आज बुधवारी सायंकाळी पंप दुरुस्त करून आणल्यानंतर पंप जोडून प्लंबर कर्मचाऱ्यामार्फत युद्धपातळीवरती बसवून घेतले ही उत्तम सेवा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्व आरोग्य अधिकारी तसेच कर्मचारी यांनी तात्काळ ही सेवा गोरगरीब रुग्णाला मिळावी या हेतूने करून घेतल्याबद्दल जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसूरकर यांनी गोरगरीब रुग्णांच्या वतीने आभार मानले आहे.
अशी उत्तम सेवा उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण गोरगरीब रुग्णांकरिता कराल त्यावेळी ईश्वर आपल्याला व आपल्या कुटुंबाला दीर्घ आरोग्य आयुष्य धनलाभ देईल असे जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी व्यक्त केले आहे.
आपला विश्वासू
राजेंद्र प्रभाकर मसुरकर
माजी विद्यार्थी
जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस
सोन्या-चांदीचे व्यापारी
जि. सिंधुदुर्ग, ता. सावंतवाडी
संपर्क क्रमांक=9422435760
8975857716
भेटण्याची वेळ – सकाळी 11 ते 1 सायंकाळी 4 ते 7

