शिवसेना नेते दीपक केसरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करणार.

शिवसेना नेते दीपक केसरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करणार.

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवसेना नेते दीपक केसरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करणार…*

*संजू परब; रक्तदान शिबिर, वह्या व धान्यवाटासारखे विविध उपक्रम राबवणार…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

शिवसेनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस सावंतवाडी शिवसेनेच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, गरजू कुटुंबाला धान्य वाटप अशा उपक्रमाचा समावेश आहे, अशी माहिती आज येथे दिली. श्री. केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलैला होत आहे. या निमित्ताने सावंतवाडी व सिंधुदुर्ग शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती श्री. परब यांनी आज येथे दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!