*कोंकण एक्सप्रेस*
*मानधनाचा शासन निर्णय करताना थेट कलाकारांना विचारात घ्या…*
*दशावतार कलाकारांची मागणी; आमदार निलेश राणेंसह अन्य नेत्यांचे मानले आभार…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
दशावतारांना मानधन वाढवून देण्यासंदर्भात शासन निर्णय करताना कलाकारांना थेट विचारात घ्या अशी मागणी सिंधुदुर्ग पारंपारिक दशावतार बहुउद्देशीय संघाच्या माध्यमातून आज येथे करण्यात आली. दरम्यान दशावतार कलाकारांच्या प्रश्नासाठी पोट तिडकीने प्रश्न मांडणारे आमदार निलेश राणे यांच्यासह अन्य नेत्यांचे आभार मानण्यात आले. येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संघाच्या पदाधिकारी आपली भूमिका मांडली.
यावेळी यापूर्वी शासनाकडून अनुदान दिले ते दशावतार कंपन्यांना किंवा मालकाला देण्यात आले. त्यामुळे त्याचा थेट फायदा दशावतार कलाकारांना झालेला नाही परिणामी शासन योजना सर्वसामान्य कलाकारांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे नव्याने शासन आदेश करताना कलाकारांचा विचार करण्यात यावा. कला सादर करताना त्यांना गणवेश बूट व अन्य साहित्य खरेदी करावे लागते. मालकांकडून फक्त मुखवटे आणी आयुधे देण्यात येतात. मात्र अन्य सर्व साहित्य कलाकारांना आणावे लागते. त्यामुळे त्यांचा गांभीर्याने विचार करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

