*सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी वासुदेव नाईक यांची नियुक्ती..*

*सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी वासुदेव नाईक यांची नियुक्ती..*

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी वासुदेव नाईक यांची नियुक्ती..*

*दोडामार्ग : शुभम गवस*

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्रातील संघटन सुदृढीकरण अभियानांतर्गत सुरू असलेल्या पदाधिकारी निवड प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी वासुदेव विष्णू नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्ष संघटना अधिक सक्षम व बळकट करण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार, कार्यकर्त्यांचे संघटन आणि जनसंपर्क वाढविण्यात नाईक यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार तसेच सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वासुदेव नाईक यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!