खारेपाटण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वनमहोत्सव सप्ताहानिमित्त वृक्षारोपण

खारेपाटण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वनमहोत्सव सप्ताहानिमित्त वृक्षारोपण

*कोंकण एक्सप्रेस*

*खारेपाटण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वनमहोत्सव सप्ताहानिमित्त वृक्षारोपण*

*खारेपाटण ः प्रतिनिधी*

कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खारेपाटणच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वनमहोत्सव सप्ताहाचे औचित्य साधून रामेश्वर नगर परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. वसीम सय्यद उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन विषयक जनजागृती रॅली काढली.

या उपक्रमांतर्गत आंबा, चिंच, कांचन आदी प्रजातींची एकूण ८२ रोपे राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला. पर्यावरण संरक्षण, हरित परिसर निर्मिती आणि शाश्वत विकासाचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!