*कोंकण एक्सप्रेस*
*कोकण एक्सप्रेस प्रतिनिधी शुभम गवस यांच्या ‘खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा?’ वृत्ताचा इम्पॅक्ट; दुसऱ्याच दिवशी दुरुस्तीला सुरुवात*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
काजुळवाडी मुख्य रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत कोकण एक्सप्रेस मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची तात्काळ दखल घेत संबंधित यंत्रणेकडून रस्त्यावरील काही मोठ्या खड्ड्यांमध्ये चिरे व खडी टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी ही कार्यवाही झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
काजुळवाडी मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, विद्यार्थी, शेतकरी तसेच स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण एक्सप्रेसचे प्रतिनिधी शुभम गवस यांनी वृत्त प्रसिद्ध केले होते.
वृत्त प्रकाशित होताच संबंधित विभागाने हालचाल करत रस्त्यावरील काही धोकादायक खड्ड्यांमध्ये चिरे व खडी टाकून तात्पुरती दुरुस्ती केली. त्यामुळे वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
दरम्यान, नागरिकांच्या समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या कोकण एक्सप्रेसच्या वृत्ताचा प्रभाव पुन्हा एकदा दिसून आला असून संबंधित विभागाने आता या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

