*सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजुर*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजुर*

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजुर*

* केंद्र सरकारच्या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्थान; प्रत्येक वर्गात १०० विद्यार्थी घेणार शिक्षण*

* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिले आरोग्य शिक्षणाचे नवे दालन*

*माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे,पालकमत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश*

*१० कोटींचा निधी मंजुर, केंद्र सरकार देणार ६० टक्के निधी*

*सिंधुदुर्ग*

पकेंद्र पुरस्कृत नर्सिंग शिक्षण बळकटीकरणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न नवीन नर्सिंग महाविद्यालये स्थापन करण्याच्या ” योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. या प्रत्येक महाविद्यालयाला प्रत्येकी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजला संलग्न बीएससी नर्सिंग महाविद्यालय नव्याने मंजूर झाले असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य शिक्षणाचे नवे दालन खुले झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यानिमित्ताने यश आले आहे. तर माजी केंद्रिय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला केलेल्या पत्रव्यवहाराला यश आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नवीन बीएससी नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात केंद्र सरकारच्या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असल्याने १० कोटीचा निधी या नरसिंग कॉलेज साठी मंजूर झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजूर झाले असल्यामुळे या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी सुविधा निर्माण झाली आहे.
या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच गुणवत्तापूर्ण नर्सिंग शिक्षण व प्रशिक्षणाची संधी मिळणार असून, भविष्यात कुशल परिचारिका तयार होऊन जिल्ह्यातील आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. जिल्ह्याचा या योजनेत समावेश झाल्याबद्दल केंद्र व राज्य सरकारचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!