पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली मित्र मंडळातर्फे दीपोत्सव

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली मित्र मंडळातर्फे दीपोत्सव

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली मित्र मंडळातर्फे दीपोत्सव*

*कणकवली ः संजना हळदिवे*

*सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स व्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री सन्माननीय श्री नितेश जी राणे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्र मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,

*या अंतर्गत परमहंस बाबा भालचंद्र महाराज संस्थान येथे, बाबा भालचंद्र महाराज यांच्या समाधी स्थळी 101 दिव्यांची आरास करण्यात येणार आहे, गोडाचा पदार्थ वाटण्यात येणार आहे,

*बाबा भालचंद्र महाराज यांच्या चरणी पालकमंत्री श्री नितेश जी राणे साहेब यांना दीर्घायुष्य लाभो, तसेच पाणी टंचाई, दुष्काळ, शेतकरी राजा यांच्या संदर्भात ही बाबा भालचंद्र महाराज यांच्या चरणी प्रार्थना केली जाणार आहे,

तरी सर्व मित्र मंडळींनी, भाविक भक्तांनी,कार्यकर्ते , चाहते, यांनी उपस्थित रहावे असे आवाहन माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!