*कोंकण एक्सप्रेस*
*विर्डी धबधबा वॉटर पार्क येथे पर्यटकाचा बुडून मृत्यू..*
*दोडामार्ग : शुभम गवस*
दोडामार्ग तालुक्यातील गोवा-कर्नाटक सीमेजवळील विर्डी धबधबा वॉटर पार्क येथे आंघोळीसाठी उतरलेल्या एका पर्यटकाचा खोल डोहात बुडून मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव विजय दोडमणी (वय २७, रा. हुबळी-धारवाड, कर्नाटक) असे आहे.
माहितीनुसार, सात जणांचा मित्रपरिवार पर्यटनासाठी विर्डी येथे आला होता. आंघोळ करताना विजय दोडमणी खोल पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस, ग्रामस्थ आणि स्थानिक युवकांनी शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला.
घटनास्थळी मोबाईल नेटवर्क नसणे, वाहनांना थेट पोहोचता न येणे तसेच निसरडा डोंगर उतार यामुळे बचावकार्यात अडचणी आल्या. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.
विशेष म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वीही बुडून मृत्यूची घटना घडली असून पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.

