मातोंड ता. वेंगुर्ले येथे “एक पेड मां के नाम” अभियान अंतर्गत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ( बाळू) देसाई यांनी वृक्षारोपण करत “धर्म संवर्धनासोबतच निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला”

मातोंड ता. वेंगुर्ले येथे “एक पेड मां के नाम” अभियान अंतर्गत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ( बाळू) देसाई यांनी वृक्षारोपण करत “धर्म संवर्धनासोबतच निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला”

*कोंकण एक्सप्रेस*

*मातोंड ता. वेंगुर्ले येथे “एक पेड मां के नाम” अभियान अंतर्गत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ( बाळू) देसाई यांनी वृक्षारोपण करत “धर्म संवर्धनासोबतच निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला”*

*वैंगुर्ले  : प्रतिनिधी*

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मातोंड ता वैंगुर्ले येथे हिंदूत्ववादी कार्यकर्ते पदाधिकारी यांना सोबत घेऊन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी धर्मजागृती सोबत वृक्षारोपण करत *धर्म संवर्धनासोबतच निसर्ग संवर्धनाचा एक आगळावेगळा संदेश दिला. जिल्ह्यातील सर्व मंडलामध्ये झाडे लावण्याचा उपक्रम सुरू आहे. आई साठी एक झाड लावा हा संदेश देत असतानाच हिंदू संमेलनाच्या निमित्ताने धर्म जागृती सोबतच हा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला.


सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . या प्रसंगी मातोंड सरपंच सौ.मयुरी वडाचेपाटकर, सोशल मिडीयाचे श्रीकृष्ण उर्फ राजु परब , पत्रकार व ग्रामपंचायत सदस्य दिपेश परब व राहूल प्रभु , ग्रामपंचायत सदस्या सौ.किशोरी परब, सौ.सुजाता सावंत, वेताळ प्रतिष्ठान चे सचिन परुळेकर, रा स्व संघाचे बाबुराव खवणेकर सर , तसेच हिंदूत्ववादी कार्यकर्ते किशोर परब ,अनिल परब , श्रीकांत परब , संतोष सावंत, प्रदिप जबडे, वसंत खाजणेकर, संतोष परब , अविनाश परब उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!