*कोंकण एक्सप्रेस*
*कोकणच्या जलविकासाला मिळणार गती; प्रलंबित धरणांच्या कामांबाबत मंत्रालयात सकारात्मक बैठक!*
*मुंबई:*
कोकणच्या प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी आणि रखडलेल्या जलविकासाच्या प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मृद व जलसंधारण मंत्री मा. श्री. संजयजी राठोड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार मा. श्री. निलेशजी नारायणराव राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत कोकणातील विविध धरणांच्या प्रलंबित विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कोकणातील पाणीप्रश्न आणि सिंचनाचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, या दृष्टीने संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कामांचा आढावा घेण्यात आला. अनेक दिवसांपासून रखडलेल्या विविध तांत्रिक आणि प्रशासकीय विषयांवर या बैठकीत चर्चा होऊन त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यात आला आहे.
”विकासकामांना गती, कोकणच्या प्रगतीला नवी दिशा!” या संकल्पनेतून कोकणातील जलसंधारणाची कामे जलद गतीने पूर्ण करण्याचा निर्धार या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.
बैठकीतील प्रमुख उपस्थिती:
मा. श्री. संजयजी राठोड (मंत्री, मृद व जलसंधारण विभाग)
मा. श्री. निलेशजी नारायणराव राणे (आमदार)
श्री. जितेंद्र एस. पापळकर (सचिव, मृद व जलसंधारण विभाग)
जलसंधारण विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी वर्ग.
या बैठकीमुळे कोकणातील प्रलंबित धरण प्रकल्पांना आता गती मिळणार असून, येथील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

