महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुखाध्यापक संघ महामंडळ मुंबई आयोजित चर्चा व कृतिसतत्रास कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा ज्ञानेश्वर म्हात्रे सरांची प्रमुख उपस्थिती लाभली

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुखाध्यापक संघ महामंडळ मुंबई आयोजित चर्चा व कृतिसतत्रास कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा ज्ञानेश्वर म्हात्रे सरांची प्रमुख उपस्थिती लाभली

*कोंकण एक्सप्रेस*

*महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुखाध्यापक संघ महामंडळ मुंबई आयोजित चर्चा व कृतिसतत्रास कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा ज्ञानेश्वर म्हात्रे सरांची प्रमुख उपस्थिती लाभली*

*सिंधुदुर्ग*

दिनांक 07.06.2026 आणि दिनांक 08.06.2026 रोजी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय कृतिसत्र पर्यटन दृष्ट्या महत्त्वाच्या थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे आयोजित करण्यात आले आहे.या कृतिसत्राचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्या मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.त्यात आजच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या हस्ते पार पडला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे चेअरमन मा. सुनिल राऊळसाहेब होते, मुख्याध्यापक संघाचे राज्याचे अध्यक्ष तानाजी माने यांनी प्रास्ताविक केले.
पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सहाय्यक शिक्षण संचालक श्री. श्रीराम पानझाडे साहेब यांनी शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले, शिक्षण क्षेत्रात होणारे नव नवीन बदल, शिक्षण विभागाकडून सुरू असलेल्या धोरणात्मक बाबी आणि त्यातील तांत्रिक अडचणी यावर सखोल मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या, मुख्याध्यापकांच्या समस्या समजून घेत त्यावर शासन आणि प्रशासन स्तरावर निश्चितपणाचे सकारात्मक विचार करून विद्यार्थी शिक्षक आणि शासन हीत जपत येणाऱ्या काळात चांगले निर्णय घेतले जातील ते सर्वांच्या हिताचे असतील.
चर्चा सत्रात मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन करताना सर्व मुख्याध्यापक यांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे आभार मानले पाहिजे कारण त्यांनी कोकणचे मंत्री मा. उदय सामंत आणि मा. नितेश राणे यांच्यामागे सतत लागून डोंगराळ व दुर्मिळ भागातील विद्यार्थी संख्येचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त होत होते त्याकरिता इयत्ता 9वी व इयत्ता दहावी या दोन्ही वर्गाची पटसंख्या 20 करण्याचे महत्वाचा निर्णय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे यांच्या दालनात बैठक बोलावून मंजूर करून घेतली त्याच्या फायदा जवळपास 900 पेक्षा जास्त शाळांना झाला.
पुढे मा. पानझडे साहेब बोलताना म्हणाले की, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांसारखा शिक्षक आमदार मी अद्याप तरी पहिला नाही सतत शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, प्रधान सचिव, शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा सर्वांना सतत भेटत असून शिक्षकांच्या समस्या सतत सोडवत असतात त्यांचा पाठपुरावा सतत सुरू असतो त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांचे त्यांच्यामुळे कामे मार्गी लागत आहेत असे गौरव उद्गार देखील केले.
याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.तानाजी माने, सचिव श्री.सागर नंदकुमार, उपाध्यक्ष श्री.सचिन नलावडे, उपाध्यक्ष श्री.सुनील घुगरे, उपाध्यक्ष श्री.सुनील पंडित,माजी अध्यक्ष श्री.जे के पाटील,विद्या समिती सचिव श्री.संजय झांबरे सर, श्री.सुनील भोर सर, कृती सत्राचे आयोजक सिंधुदुर्ग जिल्ह्या मुख्याध्यापक संघ अध्यक्ष तथा संपादक एज्युकेशनल जर्नल श्री.वामन तर्फे, सिंधुदुर्ग जिल्ह्या मुख्याध्यापक संघ सचिव श्री घावरे सर, माजी अध्यक्ष श्री.एम जी जी मातोंडकर सर, श्री.कुसगांवकर सर, सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!