आमदार प्रमोद जठार यांनी घेतले कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई चे दर्शन

आमदार प्रमोद जठार यांनी घेतले कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई चे दर्शन

*कोंकण एक्सप्रेस*

*आमदार प्रमोद जठार यांनी घेतले कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई चे दर्शन*

*महालक्ष्मी देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार जठार यांचा केला सत्कार*

*कोल्हापूर -प्रतिनिधि*

महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरामधे वसलेले एक आद्य शक्तिपीठ म्हणून ओळख असलेल्या श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर येथे आमदार प्रमोद जठार यांनी आमदार झाल्यानंतर प्रथमच आई महालक्ष्मी अंबाबाई चे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांचा सन्मान करण्यात आला.
कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे हिंदू धर्मातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते, आणि दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. महालक्ष्मी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळच नाही, तर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले देवस्थान आहे.
यावेळी आमदार प्रमोद जठार यांच्या सोबत उद्योजक प्रकाश गायकवाड, उद्योजक निलेश साळुंखे, बबलू सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!