आता पालकमंत्री राहणार सिंधू रत्न योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष

आता पालकमंत्री राहणार सिंधू रत्न योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष

*कोंकण एक्सप्रेस*

*आता पालकमंत्री राहणार सिंधू रत्न योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष*
*सिंधु रत्न योजनेला मुख्यमंत्र्यांनी संजीवनी देत*
*रोजगार,जल, सागरी आणि सर्वांगीण विकासाला दिली चालना !*

*सिंधुनगरी प्रतिनिधी*

सिंधु – रत्न योजनेच्या समितीची रचना शासनाने मंत्री मंडळाच्या बैठकीत निश्चित केली आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वेग देणारी व जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या सिंधु रत्न योजनेच्या अध्यक्षपदी जिल्ह्याचे पदसिद्ध पालकमंत्री अध्यक्ष राहतील असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तर उपाध्यक्ष पण हे मुख्यमंत्री नियुक्त असेल. या समितीच्या सदस्य पदी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश असेल.
सिंधु रत्न योजनेसाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या विकास कामाला गती देण्यासाठी ही योजना दिली आहे, त्यातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे जिल्ह्यातून स्वागत होत आहे. पर्यटन ठिकाणी सुविधा विषयक कामे, जल पर्यटन, सागरी पर्यटन,रोजगार निर्मिती,स्वयंरोजगार, हिल स्टेशन सुविधा या कामाला गती मिळणार आहे, त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला या सिंधू रत्न योजनेच्या माध्यमातून संजीवनी मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!