रानबांबुळी येथे ब्राह्मण देव मंदिरात उद्या पुनःप्रतिष्ठापना कलशारोहनकार्यक्रम

रानबांबुळी येथे ब्राह्मण देव मंदिरात उद्या पुनःप्रतिष्ठापना कलशारोहनकार्यक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*रानबांबुळी येथे ब्राह्मण देव मंदिरात उद्या पुनःप्रतिष्ठापना कलशारोहनकार्यक्रम*

*सिंधुदुर्ग नगरी १०*

रानबांबुळी येथील देव ब्राम्हण मंदीर पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा आज ११ ते १३ मे २६ या कालावधीत विवीवत कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होत आहे उद्या सकाळी १ ३ रोजी ८.३० वाजता सदगुरु गावडेकाका महाराज यांच्या हस्ते कलशारोहन होणार आहे या तरी भाविक भक्त ग्रामस्थानी उपस्थितराहूनकार्यक्रमाला शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील देव ब्राह्मण मंदिर पुनस्थापना व कलशारोहन सोहळा संपन्न होत आहे आज सोमवार दिनांक ११ रोजी सकाळी ८ वाजता प्रायश्चित्त विधी कार्यक्रम ८ . १५ देव-देवता निमंत्रण प्रधान संकल्पना गणेश, पूजन ९ वाजता पालखी देव तरंगासह श्री देव रवळनाथ, गिरोबा कडून श्री देव ब्राह्मण मंदिराकडे प्रस्थान,सकाळी १०:३० वाजता ब्राह्मणदेव मंदिराकडे कलश मिरवणूक ,सायंकाळी ७ वाजता ह .भ .प निवृती मेस्त्री महाराज यांच्या उपस्थितीत हरिपाठ,रात्र ८ वाजता ग्रामस्थांची भजने मंगळवार दिनांक १२ रोजी सकाळी ८ ते १ शास्त्रोक्त विधी देवस्थापना, वास्तू यज्ञ ,गृहयज्ञ, पर्याय होम दुपारी १ . ३० वाजतामहाप्रसाद रात्रौ ८ वाजता विजय उर्फ गुंडू सावंत विरुद्ध संदीप लोके यांची २० x २०डबलबारी जंगी सामना बुधवार दिनांक १३मे रोजी सकाळी सात वाजता स्थापित देवतापूजन, सकाळी ८ .३० वाजता प . पु . सद्गुरु गावडे काका महाराज यांच्या शुभहस्ते कलशारोहणसकाळी ९.३० वाजताकलशारोहण व मूर्ति स्थापना ध्वजारोहण प्राणप्रतिष्ठापना महापूजा, महाआरती व गाऱ्हाणे,दुपारी १ . ०० वाजता महाप्रसाद,दुपारी २ .३०वाजता हळदीकुंकू समारंभ ,सायंकाळी ४ वाजता श्री ची पालखी व तरंगा सहित देवता श्री ब्राह्मण देव मंदिर येथून देव रवळनाथ गिरोबा मंदिरकडे प्रस्थान, रात्रौ ९ वाजता “वेसरोत्पती ” हा दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ यांचा महान पौराणिक नाट्य प्रयोग संपन्न होणार आहे तरी भाविक भक्त ग्रामस्थ याने या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित लावावी असे आवाहन देव रवळनाथ गिरोबा देवस्थान कमिटी देव ब्राह्मण मंदिर कमिटी रानबांबुळी ग्रामस्थयांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!