विद्यार्थ्यांनी अधिकारी होण्याचे ध्येय बागळावे

विद्यार्थ्यांनी अधिकारी होण्याचे ध्येय बागळावे

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यार्थ्यांनी अधिकारी होण्याचे ध्येय बागळावे*

*मनोज कडुलकर यांचे आवाहन : कणकवलीत कोष्टी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव*

*कणकवली ः संजना हळदिवे*

सध्याचे युग स्पर्धेचे आहे. या युगात टिकून राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी सर्वकक्ष ज्ञान आत्मसात केले पाहिजे. कोष्टी समाजातील विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांमध्ये यश संपादन करून कुटुंब व समाजाचे नाव रोशन केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या समाजाच्यावतीने गुणगौरव करणे समाजाचे दायित्व आहे. समाजातील विद्यार्थ्यांनी अधिकारी ध्येय बाळगावे, असे आवाहन सावंतवाडीचे नायब तहसीलदार मनोज कडुलकर यांनी केले.

श्री चौंडेश्वरी मंदिराच्या वर्धापन दिन व गणेशमूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण सोहळ्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघातर्फे चौंडेश्वरी सभागृहात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी श्री. कडुलकर बोलत होते. यावेळी संघाचे उपाध्यक्ष विजय उर्फ नाना कांबळी, सचिव अनंत हजारे, खजिनदार दयानंद उर्फ नंदू उबाळे, सहसचिव सुधीर हर्णे, श्रीकृष्ण कांबळी, गिरीश धुमाळे, मनोज निग्रे, आशिष पोयेकर, राजेंद्र कवडे, भूषण हर्णे, प्रकाश बुचडे, श्रद्धा हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. कडुलकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाजसेवा संघातर्फे दरवर्षी चौंडेश्वरी मंदिराच्या वर्धापन दिनी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जातो, ही बाब कौतुकास्पद आहे. समाजाने केलेला गुणगौरवामुळे विद्यार्थ्यांचा प्रेरणा मिळते. समाजातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले पाहिजे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून अधिकारी बनावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रास्ताविकेत श्रीकृष्ण कांबळी यांनी समाजातर्फे गुणवंत गौरव सोहळा आयोजित करण्यामागील संघाचा उद्देश सांगितला. सूत्रसंचालन यांनी केले श्रृष्टी सवादे यांनी केले. आभार श्रीकांत बुचडे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

चौकट

नृत्यविष्कारांनी रसिक भारवले

श्री चौंडेश्वरी मंदिराच्या वर्धापन दिन व गणेशमूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यात अबालवृद्धासह महिलांनी गाण्यावर नृत्यविष्कार सादर केले. नृत्यांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांचा शिवराजाभिषेक सोहळा, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कलाविष्कार सादर केला. या कालाविष्कारातून कालकारांनी इतिहास जागा केला. या कलाविष्कारानंतर रसिकांनी टाळ्या वाजवून कलाकारांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!