*कोंकण एक्सप्रेस*
*दहावी निकालात सिंधुदुर्ग पुन्हा अव्वल…*
*सिंधुदुर्गचा निकाल ९८.१३ टक्के : जिल्ह्यात मालवण तालुक्याचा निकाल सर्वाधिक…*
*कणकवली ः संजना हळदिवे*
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या १० च्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने पुन्हा एकदा राज्यात अव्वल क्रमांक राखला आहे. जिल्ह्याचा निकाल ९८.१३ टक्के एवढा लागला. यात मालवण तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९८.७६ टक्के एवढा लागला आहे. त्या पाठोपाठ सावंतवाडी तालुका ९८.५९ टक्के, वेंगुर्ले ९८.५१ टक्के, कुडाळ ९८ टक्के, कणकवली ९७.९८ टक्के, वैभववाडी ९७.८६ टक्के, दोडामार्ग ९७.४७ टक्के, देवगड ९७.२५ टक्के अशी तालुकानिहाय निकालाची टक्केवारी आहे.

