दोडामार्ग इंग्लिश स्कूलचा बारावी निकाल उज्ज्वल; संचित परब तालुक्यात सर्व शाखांत प्रथम

दोडामार्ग इंग्लिश स्कूलचा बारावी निकाल उज्ज्वल; संचित परब तालुक्यात सर्व शाखांत प्रथम

*कोंकण एक्सप्रेस*

*दोडामार्ग इंग्लिश स्कूलचा बारावी निकाल उज्ज्वल; संचित परब तालुक्यात सर्व शाखांत प्रथम*

*दोडामार्ग : शुभम गवस*

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी (फेब्रुवारी 2026) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजने यंदाही उत्कृष्ट यश मिळवले आहे. वाणिज्य शाखेतील विद्यार्थी कु. संचित सुभाष परब याने 87.33 टक्के गुण मिळवत तालुक्यात सर्व शाखांमधून प्रथम क्रमांक पटकावला.

महाविद्यालयाचा एकूण निकाल 93 टक्के लागला आहे. एकूण 155 विद्यार्थ्यांपैकी 144 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

शाखानिहाय निकाल पुढीलप्रमाणे :

विज्ञान शाखा :

एकूण प्रविष्ट 74, उत्तीर्ण 71 (96%)

प्रथम : कु. अनया संतोष गवस – 452 गुण (75.33%) – तालुक्यात द्वितीय

द्वितीय : कु. अभिषेक कृष्णा तळणकर – 426 गुण (71%) – तालुक्यात तृतीय

तृतीय : कु. श्रेया तानाजी दळवी – 397 गुण (66.17%)

कला शाखा :

एकूण प्रविष्ट 45, उत्तीर्ण 40 (89%)

प्रथम : कु. सिद्धेश श्रीधर सावंत – 463 गुण (77.17%) – तालुक्यात प्रथम

द्वितीय : कु. सिद्धी संतोष गवस – 409 गुण (68.17%) – तालुक्यात द्वितीय

तृतीय : कु. सेजल शिवानंद प्रभावळकर – 386 गुण (64.33%) – तालुक्यात तृतीय

वाणिज्य शाखा :

एकूण प्रविष्ट 36, उत्तीर्ण 33 (92%)

प्रथम : कु. संचित सुभाष परब – 524 गुण (87.33%) – तालुक्यात सर्व शाखांत प्रथम

द्वितीय : कु. अतुल शिवराम मोर्लेकर – 449 गुण (74.83%)

तृतीय : कु. अनुज शिवराम मोर्लेकर – 414 गुण (69%)

या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, मुख्याध्यापक श्री. संजय पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!