*मेढे–मुळस विजघर रस्ता धोकादायक; निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या जीवितास धोका…*

*मेढे–मुळस विजघर रस्ता धोकादायक; निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या जीवितास धोका…*

*कोंकण एक्सप्रेस*

*मेढे–मुळस विजघर रस्ता धोकादायक; निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या जीवितास धोका…*

*दोडामार्ग :शुभम गवस*

मेढे ते मुळस विजघर या मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याचे बांधकाम अपूर्ण आणि असुरक्षित अवस्थेत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, प्रवीण गावस, संतोष मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान रस्त्याच्या कामात अनेक त्रुटी आढळून आल्या. काही ठिकाणी रस्ता खचला असून योग्य दर्जाचे साहित्य वापरण्यात आले नसल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कामाची तातडीने दुरुस्ती करून रस्ता सुरक्षित करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!