*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाव कामगार पोलिस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा कार्यकारिणीची निवड*
*वैभववाडी( प्रतिनिधी)*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाव कामगार पोलिस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा कार्यकारिणीची निवड उत्साहात पार पडली. या कार्यक्रमास राज्याध्यक्ष मा. श्री शिवाजीराव कोलते पाटील, अॅड. श्री संतोष पवार, श्री अशोकराव थेटे पाटील, श्री देवू सावंत, श्री उदय सावंत तसेच श्री अदुंबर तडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली :-
* जिल्हाध्यक्ष – श्री सूर्यकांत बोडके
* कार्याध्यक्ष – श्री नितीन नाईक
* जिल्हा सचिव – सौ. राखी पवार
* उपाध्यक्ष – श्री राजेश जाणकार
* उपाध्यक्ष – श्री गुरु संदेश साटम
* उपाध्यक्ष – श्री लक्ष्मण गावकर
* महिला संघटक – सौ. निर्जरा परब
* जिल्हा संघटक – श्री अनंत राणे
* प्रसिद्धी प्रमुख – श्री सुशांत नाईक
* खजिनदार – श्री सर्वेश देसाई
* सहसचिव – श्री किशोर वाघ
या निवडीमुळे संघटनेचे काम अधिक बळकट होईल व पोलिस पाटील यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी अॅड. जागृती गावडे, श्री राजेंद्रराव राणे, श्री प्रशांत धुरी, श्री सीताराम राणे, श्री प्रशांत पंडित, श्री किशोर लाड, श्री तानाजी सावंत, श्री विठ्ठल राणे आदी पोलिस स्टेशन अध्यक्ष तसेच संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते..
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून नव्याने निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या…

