*कोंकण एक्सप्रेस*
*_हरित ऊर्जेकडे वाटचाल: जिल्हाधिकारी कार्यालयातील पहिल्याच EV चे आगमन_*
*पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते इलेक्ट्रिकल वाहनाचे पूजन*
*सिंधुदुर्गनगरी, दि. ०१ (जि.मा.का) :*
पर्यावरणपूरक प्रशासनाच्या दिशेने जिल्हाधिकारी कार्यालयाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासाठीच्या ई-व्ही (इलेक्ट्रिक) कारचे पूजन पार पडले.
पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून EV वाहन उपयोगी आहे. यामुळे इंधन बचतीसह प्रदूषणात घट होण्यास मदत होणार असून ‘हरित’ प्रशासनाची संकल्पना अधिक बळकट होणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

