*कोंकण एक्सप्रेस*
*Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) सिंधुदुर्गच्या वतीने ‘प्रकृती 2.0’ समर कॅम्पचे आयोजन..*
*दोडामार्ग : शुभम गवस *
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) सिंधुदुर्ग यांच्या वतीने इयत्ता दहावी व त्यावरील विद्यार्थ्यांसाठी ‘प्रकृती 2.0’ या तीन दिवसीय समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. हा कॅम्प दि. २४ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान Shree Shantadurga Vidhyamandir येथे होणार आहे.
या शिबिरात विद्यार्थ्यांसाठी साहसी उपक्रम (Adventure Activities), शेकोटी संध्या (Campfire Nights), व्यक्तिमत्त्व विकास सत्रे (Personality Development) तसेच सांस्कृतिक कार्यक्रम (Cultural Events) यांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात नवे अनुभव घेता यावेत, आत्मविश्वास वाढवावा आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत हा या कॅम्पचा मुख्य उद्देश आहे.
‘Explore • Learn • Grow’ या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराची प्रवेश फी केवळ १५० रुपये ठेवण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी रावसाहेब देसाई (९४२०८६६८२७) व मयूर तर्पे(९०२२०७८५०३) यांच्याशी संपर्क साधावा.

