हळदणकर कराटे ब्राँचच्या कराटेपटूंचे घवघवीत यश

हळदणकर कराटे ब्राँचच्या कराटेपटूंचे घवघवीत यश

*कोंकण एक्सप्रेस*

*हळदणकर कराटे ब्राँचच्या कराटेपटूंचे घवघवीत यश*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

नुकत्याच घेण्यात आलेल्या कराटे परीक्षांमध्ये वेंगुर्ला येथील हळदणकर कराटे ब्राँचच्या कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. यशस्वी कराटेपटूंना प्रमाणपत्र व कलर बेल्ट वितरीत करण्याचा कार्यक्रम वेंगुर्ला हायस्कूलमध्ये संपन्न झाला.

नॉन व्हाईट फस्र्टमध्ये मयुरेश तांबोस्कर, सुयोग समुद्रे, मृण्मय लिंगोजी, चैतन्य तुळसकर, काजल नरसुले, सृष्टी वाघमारे, ऑरेंज बेल्टमध्ये चेतन पाटील, शुभ्रा राऊळ, प्रेरणा आरावंदेकर, लक्षिता चौधरी, अथर्व गावडे, सुजय परब, रेड बेल्टमध्ये सुयोग समुद्रे, चैतन्य तुळसकर, तेजश्री लांजेकर, विरश्री भिसे, सृष्ट वाघमारे, मृण्मय लिंगोजी, ग्रीन बेल्टमध्ये सार्थक भाटकर, ब्ल्यू बेल्टमध्ये भूमी परूळकर, यलो बेल्टमध्ये विहान चौधरी, चैतन्य तुळसकर, पर्पल बेल्टमध्ये मयंक नंदगडकर, स्वदीप उकिडवे आणि ब्रााऊन बेल्टमध्ये जान्हवी मडकईकर यांनी यश संपादन केले. या सर्वांना सिंधुदुर्ग बायकर क्लबचे लिडर दुर्गेश शेटये, प्रमुख पाहुणे डॉ.सचिन परूळकर, पालक सोनल राऊळ, वृषाली भिसे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व कराटे बेल्ट वितरीत करण्यात आले. यावेळी कराटे प्रशिक्षक पुंडलिक हळदणकर, कृष्णा हळदणकर व हळदणकर कराटे ब्राँचच्या संचालिका प्रार्थना हळदणकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!