पारपोली येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिर सुशोभीकरणासाठी १० लाखांचा निधी मंजूर…

पारपोली येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिर सुशोभीकरणासाठी १० लाखांचा निधी मंजूर…

*कोंकण एक्सप्रेस*

*पारपोली येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिर सुशोभीकरणासाठी १० लाखांचा निधी मंजूर…*

*संजू परब यांच्या हस्ते भूमिपूजनः ग्रामस्थांनी मानले आमदार दीपक केसरकर यांचे आभार..*

*सावंतवाडी ; प्रतिनिधि*

पारपोली येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाचे भूमिपूजन आज ग्रामस्थांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आमदार दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त केले. गावाच्या विकासासाठी शिंदे शिवसेना नेहमी तत्पर राहील, असा विश्वास संजू परब यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!