छत्रपती शिवाजी महाराज चौक जरीमरी कुंभारमाठ मित्रमंडळ आयोजित छत्रपती चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज चौक जरीमरी कुंभारमाठ मित्रमंडळ आयोजित छत्रपती चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*छत्रपती शिवाजी महाराज चौक जरीमरी कुंभारमाठ मित्रमंडळ आयोजित छत्रपती चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न*

*मालवण :  प्रतिनिधि*

दिनांक 13 एप्रिल 2026 ते 17 एप्रिल 2026 या पाच दिवसाच्या अंडरआर्म क्रिकेट सामने खेळवण्यात आले या सामन्यात जिल्ह्यातील व महाराष्ट्र राज्यातील विविध खेळाडुंनी या स्पर्धेत सहभाग घेतला यावेळी मंडळाच्या वतीने सर्व संघांचे सहभाग घेतल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले

छत्रपती शिवाजी महाराज चौक जरीमरी कुंभारमाठ मित्रमंडळ आयोजित छत्रपती चषक स्पर्धेचा

प्रथम क्रमांकाचे मानकरी सोहम स्पोर्टस कुडाळ हा संघ ठरला तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी यतीन स्पोर्ट परुळे वेंगुर्ला हा संघ ठरला

राजकोट बॉईज
तृतीय क्रमांक मानकरी

आई माऊली मेढा
चतुर्थ क्रमांक मानकरी

या स्पर्धेतील अन्य विविध कामगिरी बजावणारे खेळाडु
मॅन ऑफ द मॅच
गोट्या कांबळी

इमर्जिंग प्लेयर
दुर्वेश डिचवलकर

आदर्श खेळाडू
शुभम तोडणकर

मॅन ऑफ द सिरीज
राहुल कळव

उत्कृष्ट क्षेत्ररक्षक
सुशील बंगे

उत्कृष्ट यष्टिरक्षक
सुशांत सामंत

उत्कृष्ट गोलंदाज
मिलिंद पाटकर

उत्कृष्ट फलंदाज
गोट्या कांबळी

यावेळी या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास मालवण पंचायत समिती सभापती प्रज्ञा भाऊ चव्हाण ,भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, युवासेना उपतालुकाप्रमुख तथा कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य राहुल परब , छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष पंकज करंजेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य मनोज डिचवलकर मंडळाचे सदस्य क्रिकेट प्रेमी कुंभारमाठ ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांनी मंडळास शुभेच्छा दिल्या मंडळाच्या क्रिकेट स्पर्धेचे कौतुक केले तसेच सामाजिक भान बाळगुन मंडळ विविध क्षेत्रात आपले देत असलेले योगदान याबद्दल कौतुक करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!