श्री रवळनाथ देवस्थानचा प्रथम वर्धापनदिन 19 रोजी

श्री रवळनाथ देवस्थानचा प्रथम वर्धापनदिन 19 रोजी

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री रवळनाथ देवस्थानचा प्रथम वर्धापनदिन 19 रोजी*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ देवस्थानचा प्रथम वर्धापनदिन रविवार दि. 19 एप्रिल रोजी (अक्षय्य तृतीया) विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी लघुरूद्र, श्रीसत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायं. 4 वा. हळदीकुंकू समारंभ, सायं. 6 वा. भजन, सायं.6.30 वा. दीपोत्सव, सायं. 7 वा. खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव रवळनाथ देवस्थानतर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!